अकाउंट डिलीट करण्याची पॉलिसी- FAQs
Last updated: 20th September 2022
1. तुम्ही अकाउंट डिलीट करण्याची प्रक्रिया कशी सुरू कराल?
- 'सेटिंग्ज' मध्ये जा आणि 'अकाउंट डिलीट करण्याची रिक्वेस्ट'/'माझा डेटा डिलीट करा' वर क्लिक करा. .
- लॉग इन करा आणि तुमचे अकाउंट ऑथेंटिकेट करा.
- तुमचा मोबाईल फोन नंबर आणि ईमेल आयडी एंटर करा (हे आम्हाला तुमच्या अकाउंटशी संबंधित माहिती डाउनलोड करण्यात मदत करण्यासाठी व तुमच्यापर्यंत पोहोचण्यास सक्षम करते)
- तुमचे अकाउंट डिलीट करण्याचे कारण एंटर करा (जर तुमची इच्छा असेल तर)
- 'सबमिट' वर क्लिक करा
2. मी अकाउंट डिलीट करण्याची रिक्वेस्ट सबमिट केल्यावर काय होईल?
एकदा तुम्ही आमच्या अॅपवरून अकाउंट डिलीट करण्याची प्रक्रिया सुरू केल्यानंतर, तुम्ही तुमच्या अकाउंटमध्ये प्रवेश करू शकणार नाही आणि तुमचे प्रोफाइल, लाइक्स, फॉलोअर्स, कमेंट्स, फोटो, व्हिडिओ, पोस्ट, चॅट यासह तुमच्या खात्यातील विशेषता इतरांना दिसणार नाहीत. तसेच, तुम्ही अॅपद्वारे कोणताही कंटेंट डाउनलोड/शेअर/पोस्ट/अपलोड करण्यात किंवा अन्यथा उपलब्ध करून देण्यात अक्षम असाल.
तुमचे अकाउंट आणि त्यातील कंटेंट पूर्णपणे डिलीट करण्यासाठी आम्हाला काही वेळ लागू शकतो. तुम्ही जनरेट केलेल्या कंटेंटच्या काही लिंक तुम्ही अकाउंट डिलीट करण्याची प्रक्रिया सुरू केल्यानंतर काही दिवसांसाठी दृश्यमान असू शकतात. तथापि, अशा लिंक्सवरूनही तुमचे प्रोफाइल अॅक्सेस करता येणार नाही.
तुम्ही तुमचे अकाउंट डिलीट केल्यानंतर, आम्ही मर्यादित कालावधीसाठी विविध नियामक आणि अनुपालन हेतूंसाठी तुमच्या अकाउंटवरून जनरेट केलेल्या वैयक्तिक माहितीसह काही डेटा राखून ठेवतो. आम्ही तुमचे अकाउंट डिलीट करण्याबाबत अॅग्रीग्रेटेड माहिती देखील ठेवू शकतो.
3. मी अकाउंट डिलीट करण्याची रिक्वेस्ट थांबवू शकतो/शकते का?
एकदा तुम्ही अकाउंट डिलीट करण्याची रिक्वेस्ट सबमिट केल्यानंतर, तुमची रिक्वेस्ट सबमिट केल्यापासून 30 दिवसांच्या आत आमच्याअॅपमध्ये लॉग इन करण्याचा आणि डिलीट करण्याची रिक्वेस्ट रद्द करण्याचा पर्याय तुमच्याकडे असतो. तथापि, 30 दिवसांनंतर, तुमचे अकाउंट डिलीट केले जाईल आणि ते पुनर्प्राप्त केले जाऊ शकत नाही.
4. मी माझा डेटा कसा डाउनलोड करू शकतो?
अकाउंट डिलीट करण्याची रिक्वेस्ट सबमिट करताना प्रदान केलेला तपशील, तुमच्या अकाउंटशी संबंधित माहिती डाउनलोड करण्यात मदत करण्यासाठी व तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी वापरला जाईल. डाउनलोडसाठी उपलब्ध असलेल्या डेटामध्ये तुमच्या पोस्ट, पेमेंट हिस्ट्री, कमेंट्स आणि प्रतिक्रिया, फॉलोअर्स आणि फॉलोअर्सची यादी आणि डेटाच्या इतर कॅटेगरीजचा समावेश असू शकतो. कृपया लक्षात ठेवा की डाउनलोड तुम्ही करण्यासाठी व तुम्हाला या माहितीची प्रत प्रदान करण्यासाठी आम्हाला काही वेळ लागू शकतो.
5. डिलीट केल्यावर माझ्या अकाउंटमध्ये उपलब्ध असलेल्या मिंट्स आणि चीअर्सचे काय होईल?
अकाउंट डिलीट करण्याआधी आम्ही युजरला त्यांच्या मिंट्स आणि चीअर्सचा वापर करण्यास प्रोत्साहित करतो. यामुळेच, आम्ही कोणताही रिफंड देत नाही. अधिक तपशिलांसाठी, कृपया https://help-takatak.mojapp.in/policies/cheers-policy येथे उपलब्ध चीअर्स पॉलिसी पहा.